महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विचार मांडणारे कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. कनक सरकार यांच्यावर आरोप करणारी एक फेसबुक पोस्ट समोर आली आहे. पत्रकार अदरीजा चॅटर्जीने वर्गात घडलेल्या या प्रसंगाची माहिती देणारी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तुझा फिगर मॉडेलसारखी आहे. त्यामुळे तुला मॉडेल बनायला आवडेल ? असा प्रश्न त्यांनी एका विद्यार्थिनीला विचारला होता.

मी वर्गात एकदिवस प्रेझेंटेशन देत होते. त्यावेळी कनक सरकार यांनी मला मध्येच थांबवले. मला काही प्रश्न विचारायचा असेल म्हणून त्यांनी मला थांबवले असावे असे मला वाटले. पण त्यांनी मला माझी फिगर मॉडेलसारखी असल्यामुळे मला मोठे होऊन मॉडेल बनायला आवडेल का ? असा प्रश्न विचारला.

कनक सरकार यांच्यावर काही विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. मागच्यावर्षी #MeToo चळवळ सुरु असताना कनक सरकार यांचे नाव एका फेसबुक पोस्टमध्ये पुढे आले होते. कनक सरकार जाधवपूर विद्यापीठात पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतात. या प्राध्यापकाने महिलांच्या कौमार्यासंदर्भात लिहिलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.

जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांनी लिहिलं आहे की, कुमारी वधू का नाही? तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का ? पुढे त्यांनी लिहिलं आहे की, अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो.