दक्षिण वझिरिस्तान प्रांतातील पाकिस्तानचा तालिबान प्रमुख म्हणून बहावल खान याच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्लाह नझीर ठार झाल्यानंतर बहावल खान याच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये बहावल खान याने दहशतवादी म्हणून भारतीय सैन्याशी लढा दिला आहे.गुरुवारी येथील अंगूर अड्डा येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात नझीर याच्यासह १२ जण ठार झाले. त्यानंतर लगेचच बहावल खान याच्याकडे प्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली. बहावल खान हा अहमदझाई वजीर जमातीमधील काकाखेल या उपजमातीचा असून पूर्वी तो बसचालक म्हणून काम करीत असे.बहावल खान हा नझीर याचा निकटचा साथीदार होता आणि तो दक्षिण वझिरिस्तान प्रांतात शांतता प्रस्थापित करील आणि अफगाणिस्तानातील परदेशी फौजांवर हल्ले चढवेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.