News Flash

राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये खडाजंगी; अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय

पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर होणार निर्णय

संग्रहित (फोटो सौजन्य : पीटीआय)

काँग्रसेच्या अध्यक्षपदाबाबत जून महिन्यात निर्णय घेण्याचं ठरलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. राहुल गांधींसमोर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी राहुल गांधी सर्व काही संपवा आणि आता पुढचा विचार करा असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जून २०२१ मध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती के सी वेगणुगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केलं जावं अशी मागणी केली. निवडणुकांमधील पराभवानंतर या नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावरुन गदारोळ निर्माण झाला होता.

दुसरीकडे गांधींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए के अँटनी, तारिक अन्वर यांनी बंगाल आणि तामिळनाडू यांच्यासहित पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. यावेळी एका नेत्याने म्हटलं की, “आपण नेमक्या कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत आहोत? भाजपा आपल्याप्रमाणे अंतर्गत राजकारणावर चर्चा करत नाही? त्यांची प्राथमिकता आधी राज्यांच्या निवडणुका आणि नंतर संस्थात्मक निवडणुका असतात”.

अखेर दुसऱ्या गटाने माघार घेतली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोनिया गांधी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १९९७ मध्ये अखेरची निवडणूक झाली होती.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरुन माघार घेतल्यानंतर २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा सूत्रं सोपवण्यात आली होती. निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे सोनिया गांधी यांनीही आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर राहुल गांधी अध्यक्षपद न स्वीकारण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सोबतच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे ही जबाबदारी द्यावी असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे.

काँग्रेसमधील काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात पक्षनेतृत्वावरुन प्रश्न विचारले होते. ग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली होती. या पत्रावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद,माजी केंद्रीय मंत्री व खासदार आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तन्खा, कार्यकारी समितीचे सदस्य मुकुल वासनिक, जितीन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा, राजेंद्र कौर भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज भवन, पी. जे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, काँग्रेसचे नेते राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद, हरयाणा विधानसभेचे माजी सभापती कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 4:14 pm

Web Title: new congress president in june decision after argument at meeting sgy 87
Next Stories
1 ‘चलो बुलावा आया है’ फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन
2 HAL च्या ‘हॉक-आय’ मधून ‘SAAW’ ची यशस्वी चाचणी, समजून घ्या किती घातक आहे हे शस्त्र
3 बँका, पतसंस्था हप्त्यांची वसुली करताना…; राज ठाकरेंचं थेट RBI गव्हर्नरला पत्र
Just Now!
X