News Flash

कलामांचे निवासस्थान केंद्रीय मंत्र्यांना देण्यावरून दिल्लीत नवा वाद

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या या निर्णयावर आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली.

राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ. कलाम हे दिल्लीतील प्रसिद्ध ल्युटन्स झोनमधील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी राहात होते.

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम नवी दिल्लीमध्ये ज्या निवासस्थानी राहात होते, ते आता केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना देण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या या निर्णयावर आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली. डॉ. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून हे निवासस्थान केंद्र सरकारने ज्ञान केंद्र म्हणून विकसित करायला हवे होते, अशी मागणी आपने केली आहे.
राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ. कलाम हे दिल्लीतील प्रसिद्ध ल्युटन्स झोनमधील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी राहात होते. त्यांच्या निधनानंतर हे निवासस्थान महेश शर्मा यांना देण्याचा निर्णय नगरविकास मंत्रालयाने घेतला. याबाबत महेश शर्मा म्हणाले, नगरविकास मंत्रालयाने १०, राजाजी मार्ग हे निवासस्थान मला देण्याबद्दल विचारणा केली होती. मी त्यांना होकार कळवला आहे. ल्यूटन्स झोनमधील कोणताही बंगला स्मृतीस्थळ म्हणून विकसित न करण्याचे सरकारचे धोरण आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांनी तुघलक रस्त्यावर त्यांचे वडील चरणसिंग राहात असलेले निवासस्थान स्मृतीस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली होती. मात्र, ती सुद्धा सरकारने फेटाळली होती, असे महेश शर्मा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 11:03 am

Web Title: new controvercy over kalams bunglow allotted to tourism minister
Next Stories
1 ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव सरकारला पद्मभूषण पुरस्कार परत करणार
2 काश्मीरमधील चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासिम ठार
3 फटाक्यांवरील प्रतिबंध काळात वाढ नाही!
Just Now!
X