News Flash

राष्ट्रध्वजावर मोदींनी स्वाक्षरी केल्याने नवा वाद

नरेंद्र मोदींनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची टीका विरोधकांनी त्यांच्यावर केली

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोदींनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची टीका विरोधकांनी त्यांच्यावर केली.
न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध हॉटेल वॉल्डॉर्फ एस्टोरियामध्ये मोदी उतरले आहेत. ‘फॉर्च्युन-५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांच्या सीईओेनी गुरुवारी रात्री मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सर्व निमंत्रितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. प्रसिद्ध बल्लवाचार्य विकास खन्ना यांनी या भोजनासाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे एकूण २६ पदार्थ तयार केले होते. ‘हिंदूस्थानी सण’ या संकल्पनेवर आधारित विविध पदार्थ बनविण्यात आले होते. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मोदींनी विकास खन्ना यांना त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी करून दिली आणि चविष्ट जेवण तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्यामुळे मोदींवर टीका करण्यात येऊ लागली आहे. विकास खन्ना हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांना मोदींची स्वाक्षरी असलेला राष्ट्रध्वज देण्यात येणार आहेत, असे त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 4:53 pm

Web Title: new controversy over narendra modis sign on indian flag
Next Stories
1 आयफोन खरेदीसाठी नाद खुळा, रांग लावण्यासाठी पाठवला रोबोट!
2 तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेसाठी सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव
3 महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱयाची मार्क झकरबर्गकडून दखल
Just Now!
X