देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले आकडे हे सांगत आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ६०हजार ७५३ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता सात लाख ६० हजार १९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये देशातले ९७ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत १,६४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आत्तापर्यंतचा करोनामृत्यूंचा आकडा आता तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासात ३३ लाख ८५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २९ लाख १३ हजार २१९ जणांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख ८६ हजार ८६६ इतकी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता २७ कोटी २३ लाख ८८ हजार ७८३ वर पोहोचली आहे.