अनावश्यक मेलमुळे भ्रमणध्वनीची मेमरी फूल होण्याचा प्रकार आणि ती डिलीट करण्यात वाया जाणारा वेळ यापासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलने एक नवे फीचर आणले असून त्यामुळे तुम्ही एखाद्याला पाठवत असलेला मेल ठरावीक कालावधीनंतर आपोआर डिलीट होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठविलेले खासगी मेल फॉरवर्ड किंवा कॉपी करता येणार नाहीत.

‘कॉन्फिडेन्शल मोड’ असे या फीचरचे नाव असून ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवत आहात त्यांच्या मेल बॉक्समध्ये तो मेल किती दिवस ठेवायचा आहे याचा निर्णय तुम्हाला घेता येणार आहे. मेल कम्पोझ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कॉन्फिडेन्शलचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून मेल कधी डिलीट करावयाचा त्याची तारीख निश्चित करावयाची आहे.

तुम्ही सेट केलेल्या तारखेला त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समधील मेल डिलीट होईल. जीमेलचे हे नवे फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध आहे.