News Flash

लिबियात इसिसकडून २१ ख्रिश्चनांचा शिरच्छेद

इसिसच्या अतिरेक्यांनी एक दृश्यचित्रफीत जारी केली असून त्यात लिबियामध्ये २१ इजिप्शियन कोप्टिक ख्रिश्चनांचा शिरच्छेद केल्याचे दिसत आहे

| February 17, 2015 01:01 am

इसिसच्या अतिरेक्यांनी एक दृश्यचित्रफीत जारी केली असून त्यात लिबियामध्ये २१ इजिप्शियन कोप्टिक (मूळ रहिवासी) ख्रिश्चनांचा शिरच्छेद केल्याचे दिसत आहे. त्यानंतर इजिप्तने जोरदार लष्करी प्रत्युत्तर दिले असून इसिसच्या छावण्यांवर बॉम्बफेक केली आहे. पाच मिनिटांच्या अतिशय भीषण अशा या व्हिडिओत ओलिसांना हातकडय़ा घातल्या असून अंगात नारिंगी सूट घातला आहे व त्यांना काळा बुरखा घातलेले अतिरेकी लिबियातील त्रिपोली बंदराजवळ शिरच्छेद करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहेत.
या दृश्यफितीत एक अतिरेकी असे म्हणतो की, तुम्ही ओसामा बिन लादेनला मारून त्याचा मृतदेह समुद्रात टाकलात आता आम्ही तुमचे रक्त त्यात मिसळणार आहोत. लिबियात महिनाभरापूर्वी २१ इजिप्शियनांची हत्या करण्यात आली होती. याचा अर्थ दक्षिण इटलीमध्येही इसिसला पाठिंबा देणारा इस्लामी गट आहे असे सूचित होत आहे.
आता आमचा गट रोमवर विजय मिळवणार आहे. कट्टर गटाकडून सीरिया व इराकच्या बाहेर प्रथमच शिरच्छेद करण्यात येत आहे.
आमच्या सशस्त्र दलांनी लिबिया अगेन्स्ट दाएश (आयएस) संघटनेच्या ठिकाणांवर सोमवारी हल्ले केले असून प्रशिक्षण ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. इजिप्तचे पंतप्रधान अब्देल फताह अल सिसी यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर सांगितले की, दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याची आम्हाला मुभा आहे व आम्ही आमच्या लोकांच्या हत्येचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.
सिसी यांनी सांगितले की, आपण इजिप्तच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची बैठक बोलावली असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल. त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना न्यूयॉर्कला पाठवले असून त्यांना दहशतवाद विरोधी बैठकीत सहभागी होण्यास सांगितले आहे.
इजिप्तने शिरच्छेदाच्या प्रकरणी सात दिवसांचा दुखवटा पाळला आहे. इजिप्तच्या मेना या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, कॉप्टिक चर्चने २१ इजिप्शियन ख्रिश्चन ठार झाल्याचे म्हटले आहे. सुन्नी मुस्लिमांच्या अल अझर या संस्थेने या नृशंस घटनेचा निषेध केला आहे. आम्हाला या घटनेने अतिशय दु:ख होत आहे असे या संघटनेने म्हटले आहे.
मध्य पूर्वेत इजिप्तमध्ये कोप्टिक ख्रिश्चन समुदाय मोठा असून तेथे त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. २०११ मध्ये इजिप्तमध्ये उठाव झाल्यानंतर सरकारचा सल्ला झुगारून अनेक इजिप्शियन लोक लिबियात गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 1:01 am

Web Title: new islamic state video purports to show mass beheading of christian hostages
टॅग : Isis
Next Stories
1 केवळ भाषणबाजीने हिंदू ऐक्य अशक्य
2 केंद्रीय मंत्रिमंडळात किंडलचा वापर!
3 ‘आप’ची राज्यांमध्ये विस्तारण्याची योजना
Just Now!
X