News Flash

‘तुमचा मृत्यू कधी होणार’ हे सांगणारी चाचणी विकसित

आपण किती जगणार आहोत आणि केव्हा मरणार आहोत याची आपल्याला कधीच कल्पना नसते, पण ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी आता मृत्यू चाचणी

| August 12, 2013 04:43 am

आपण किती जगणार आहोत आणि केव्हा मरणार आहोत याची आपल्याला कधीच कल्पना नसते, पण ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी आता मृत्यू चाचणी शोधून काढली असून, त्यात तुमची अजून या पृथ्वीतलावर किती वर्षे उरली आहेत हे सांगितले जाऊ शकेल. जगात अशी चाचणी विकसित केली जाण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. लँकेस्टर विद्यापीठाच्या अ‍ॅनेटा स्टेफनोव्हस्का व पीटर मॅकलिंटॉक यांनी या चाचणीचे पेटंटही घेतले आहे.
येत्या तीन वर्षांत सामान्य लोकांसाठी वापरता येईल अशा पद्धतीचे उपकरण या चाचणीसाठी विकसित केले जाणार असून ते डॉक्टरांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
स्टेफनोव्हस्का यांनी सांगितले, की आम्ही एक विशिष्ट प्रकारचा माहितीसंग्रह तयार करीत आहोत व प्रत्येक व्यक्तीच्या पेशींच्या दोलनांची तुलना त्याच्यातील आकडय़ांशी करून त्या व्यक्तीचा मृत्यू कधी होईल हे सांगता येईल, किंबहुना त्यांच्या मृत्युसमयी वयाचा नेमका आकडा सांगता येईल.
कशी आहे ‘मृत्यू चाचणी’
या चाचणीत वेदनारहित अशी लेसर शलाका मनगटी घडय़ाळासारख्या यंत्राने त्वचेच्या पृष्ठभागावर सोडली जाते. यात आंतरस्तरीय पेशींचे विश्लेषण करून आपले शरीर वयपरत्वे किती दिवसांत उतरणीस लागेल किंवा त्याला वार्धक्य येईल याचे मापन केले जाते. शरीरातील अतिशय गुतागुंतीच्या शारीरिक क्रियांना रक्तवाहिन्या, सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रतिसाद देत असतात, त्याचाच वापर या मृत्यू चाचणीत करण्यात आला असल्याचे ‘संडे टाइम्स’ने म्हटले आहे. या आंतरस्तरीय पेशींमधील दोलनांचे मापन करून कर्करोग, विस्मृती यांसारख्या रोगांचा अंदाज घेतला जातो व मृत्यूपूर्वीचा किती काळ शिल्लक आहे ते समजते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 4:43 am

Web Title: new laser death test predicts how long you have left to live
Next Stories
1 सिगरेटपायी मुलाचा बळी
2 पंजाब सरकारकडून विद्यार्थिनींना सायकली
3 जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा – मायावती
Just Now!
X