29 May 2020

News Flash

रिक्षाचालकावर ‘सीट बेल्ट’ न घातल्यामुळे कारवाई, नव्या कायद्यानुसार आकारला दंड

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला रोखलं. पण...

(सांकेतिक छायाचित्र)

देशात नव्या वाहतूक कायद्याच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून यानुसार आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ दंडामुळे वाहनचालकांमध्ये धास्ती आहे. चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात असल्याची चर्चा असतानाच आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

नव्या वाहतूक कायद्यानुसार बिहारच्या मुझफ्फरापूर येथे एका रिक्षाचालकावर चक्क सीट बेल्ट न घातल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. रिक्षाला सीटबेल्ट नसतो तरीही अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी(दि.14) मुझफ्फरपूरच्या सराय परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला रोखलं. पण, त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचं पाहून पोलिसांनी त्याच्यावर सर्वात कमी दंड आकारण्याचं निश्चित केलं. त्यानंतर, कायद्यातील नव्या तरतुदींनुसार सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये ही सर्वात कमी दंडाची रक्कम त्याच्याकडून आकारण्यात आली.

आणखी वाचा : इतकं मोठं डोकं…हेल्मेट न घालता पोलिसांसमोरही बिनधास्त फिरतो हा व्यक्ती!

“तो रिक्षाचालक अत्यंत गरीब होता, आर्थिक परिस्थिती खराब असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे त्याला सर्वात कमी दंड भरण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये ही सर्वात कमी दंडाची रक्कम त्याच्यावर आकारण्यात आली. हे चुकीचं आहे पण केवळ दंडात्मक कारवाई करता यावी आणि दंड वसूल करता यावा म्हणून रिक्षाचालकावर अशाप्रकारे कारवाई करण्यात आली”, अशी माहिती  एसएचओ अजय कुमार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 12:50 pm

Web Title: new motor vehicle act 2019 auto driver gets fined for not wearing seat belt sas 89
Next Stories
1 मर्डर ट्रायलमधलं सेक्सी संभाषण ऐकून खुद्द न्यायाधीशही चळले
2 इतकं मोठं डोकं…हेल्मेट न घालता पोलिसांसमोरही बिनधास्त फिरतो हा व्यक्ती!
3 VIDEO: “कोण मोदी? मोदी साताऱ्याला पेढेवाले आहेत”
Just Now!
X