News Flash

करोनाचे आणखी एक उत्परिवर्तन

या नवीन विषाणूमुळे रुग्णांमध्ये वजन कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वजन कमी होण्यास कारणीभूत विषाणूचा ‘एनआयव्ही’कडून शोध

नवी दिल्ली : ब्राझील आणि ब्रिटनमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नाक व घशातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये  करोनाचा  बी.१.१.२८.२ हा नवीन विषाणू आढळला आहे. जनुकीय क्रमवारी निश्चित करताना पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला   (एनआयव्ही) या विषाणूचा शोध लागला. या नवीन विषाणूमुळे रुग्णांमध्ये वजन कमी होत असल्याचे दिसून आले आहे.  त्याचा अभ्यास सीरियन हॅमस्टर्स प्रारू पाच्या आधारे करण्यात आला.

बी.१ प्रकारातील या विषाणूचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या विषाणूंची संख्या श्वसनमार्गात आल्यानंतर वाढते. नंतर फुफ्फुसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. नऊ सीरियन हॅमस्टर्सवर ज्या चाचण्या करण्यात आल्या त्यात वेरो सीसीएल ८१ पेशीत हा विषाणू वाढत असल्याचे दिसून आले.

नवीन विषाणू हा डेल्टा विषाणूसारखाच असून तो अल्फा प्रकारापेक्षा घातक आहे. हॅमस्टर्सवरील प्रयोगात बी १.१.२८.२ विषाणूचा वापर करण्यात आला असता त्यांच्यात  या विषाणूंची संख्या वाढण्याचे प्रमाण सहा पटीने वाढलेले दिसले. बी १.१.२८.२ प्रकारचा हा विषाणू सहजपणे वेगळा काढता येतो व त्याची जनुकीय क्रमवारी निश्च्रित करता येते. त्याचा साथरोगशास्त्रीय अभ्यास सीरियन हॅमस्टर्सच्या प्रारूपाने करण्यात आला. त्यात बी .१ विषाणू प्रकारापेक्षा तो जास्त धोकादायक दिसून आला. यात रोगाची गंभीरता जास्त होती .

सध्या डेल्टा हा विषाणू ब्रिटनमध्येही आढळत असून त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढते. बी १.१.२८.२ हा विषाणू हॅमस्टर्समध्ये बी.१ प्रकारातील विषाणूंच्या तुलनेत जास्त गंभीर प्रकारचा न्यूमोनिया निर्माण करतो. बी.१ मालिकेतील या विषाणूमुळे हॅमस्टरच्या रक्तद्रवात बी .१.१.२८.२ या विषाणूला नष्ट करण्याचे प्रमाण कमी झाले. या विषाणूवर जनुकीय क्रमवारीच्या पातळीवर आणखी लक्ष ठेवण्याची आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली आहे.  त्याची रोगकारक क्षमता व प्रतिकारशक्तीला चकवा देण्याची पद्धत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:19 am

Web Title: new mutation of the corona found in brazil and britain passengers zws 70
Next Stories
1 ‘इस्रो’कडून तीन प्रकारची श्वसनयंत्रे
2 ‘अनाथ मुलांची माहिती देण्यात दिल्ली, प. बंगालचे असहकार्य’
3 मेहुल चोक्सी याच्या अपहरणाच्या दाव्याची चौकशी
Just Now!
X