24 October 2020

News Flash

23 वर्षांत पहिल्यांदाच खासदारांनी करून दाखवला ‘हा’ पराक्रम

यापूर्वी 1996 रोजी हा विक्रम झाला होता.

11 जुलै 2019 ही तारीख देशाच्या संसदेच्या इतिहासातील लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे. 11 जुलै रोजी सुरू झालेले लोकसभेचे कामकाज तब्बल 13 तास चालल्याची माहिती समोर आली आहे. सकळी 11 वाजता सुरू झालेले संसदेचे कामकाज रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी संपले. गेल्या 20 वर्षांमध्ये संसदेचे सर्वाधिक कामकाज 11 जुलै रोजी झाल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान, प्रश्नोत्तर आणि शून्य पहराव्यतिरिक्त अर्थसंकल्पातील रेल्वेशी निगडीत अनुदानाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आला होता.

दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगण्यावरून एकाच दिवसात अर्थसंकल्पातील रेल्वेच्या विषयांवर चर्चा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जास्तीत जास्त खासदारांना यावेळी आपले म्हणणे मांडण्याचे, तसेच पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदारांनाही संधी देण्यात यावी, असे ठरवण्यात आले होते. दरम्यान, अनेकांना यावेळी बोलण्याची संधी दिल्याची माहिती सू्त्रांकडून देण्यात आली. सभापतींच्या या सुचनेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सभापतींनी कामकाजाची पद्धतच बदलली. माझी पत्नी रूग्णालयात दाखल असतानाही मी आज संसदेत आहे. सर्व खासदारांचे त्यांच्या नव्या पद्धतीला समर्थन असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार जगदम्बिका पाल यांनी दिली.

यापूर्वी 1996 साली संसदेत सर्वात जास्त वेळ कामकाज सुरू असल्याचा रेकॉर्ड आहे. त्यावेळी एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदी होते. तसेच रामविलास पासवान यांच्या खांद्यावर रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. दरम्यान, 24, 25 आणि 26 जुलै रोजी रेल्वेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली होती. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेले कामकाज 27 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी पूर्ण झाले. दरम्यान, हे कामकाज सर्वाधिक म्हणजेच 20 तास सुरू होते. त्यावेळी अखेरचे वक्ता म्हणून भाजपाचे भानू प्रताप सिंह वर्मा यांनी सहभाग घेतला होता. भानू प्रताप सिंह वर्मा हे त्यावेळी पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेले होते. 11 जुलै रोजी संसदेच्या कामकाजादरम्यानही भानू प्रताप सिंह वर्मा हे सहभागी होती. तसेच त्यांनी यावेळी 1996 साली झालेल्या संसदेच्या रेकॉर्ड कामगिरीचीही आठवण करून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 4:00 pm

Web Title: new record after 23 years indian parliament mp work for continues 13 hours jud 87
Next Stories
1 चीनी सैनिकांची लडाखमधून घुसखोरी, भारतीय जमिनीवर झळकावले झेंडे
2 चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर
3 बंदुक घेऊन नाचणाऱ्या भाजपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी
Just Now!
X