मानवी मेंदूतील आखूड डीएनएमुळे स्मृतिभ्रंश व स्वमग्नता यासारखे विकार कसे होतात यावर प्रकाश पडू शकेल असे एका डीएनए संबंधित नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे. माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिने येथील संशोधकांना असे दिसून आले की, मानव विशिष्ट एपिजेनेटिक गुणधर्म असलेली जनुके ही जंक डीएनए असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. त्यातून मानवी मेंदूची निर्मिती व मेंदूविषयक रोग यावर नवा प्रकाश पडला आहे. मानवी जिनोममध्ये डीएनएचे अनेक प्रकारचे क्रम आहेत जे इतर प्राण्यांच्या डीएनएपेक्षा वेगळे आहेत. हे डीएनए माणसाच्या आकलन प्रक्रियेशी संबंधित आहेत. या डीएनएची धाग्याच्या पातळीवर  त्यांची तुलना करण्यापेक्षा दोन जिनोममधील क्रोमॅटिनची तुलना करणे योग्य आहे. क्रोमॅटिन ही डीएनएची बांधणी करणारी एक संरचना आहे व त्यामुळे एखादा जनुक कसा आविष्कृत होणार हे ठरते. मानवी जिनोममध्ये असे शेकडो भाग आहेत ज्यांच्यात क्रोमॅटिनची रचना प्रमस्तिष्कातील न्यूरॉन्समध्ये वेगळी आहे. आकलनाशी संबंधित वर्तन ज्या भागाशी निगडित असते त्यात हा फरक मानव व इतर प्राणी यांच्या मेंदूत दिसून येतो.
मानवी जिनोमचा नकाशा तयार करताना एरवी दुर्लक्षित झालेले एपिजिनॉमिक्समधील भाग दृगोच्चर झाले आहेत, असे डॉ. सॅखरॅम अकबरियन यांनी म्हटले आहे. प्रमस्तिष्कातील क्रोमॅटिन धाग्यांचे छोटे तुकडे वेगळे करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात ते कोणते जनुकीय संदेश पाठवतात याचा विचार करण्यात आला. डीपीपी-१० हे जनुक मानवी मेंदूच्या निकोप वाढीस महत्त्वाचे असते. त्यातील क्रोमॅटिनच्या वेगवेगळ्या रचना असतात व त्या प्राण्यांपेक्षा वेगळ्या असतात.  चिंपांझी व मकाव यांच्यापेक्षा त्या वेगळ्या असतात. पूर्वीचा मानव व आताचा मानव यांच्यातही त्या वेगळ्या असतात. अनेक मेंदूरोग असे आहेत जे फक्त मानवातच आढळतात. स्मृतिभ्रंश, स्वमग्नता व नैराश्य यात एपिजेनिटिक्सच्या अभ्यासातून बरीच माहिती मिळू शकते असा दावा अकबरियन यांनी केला आहे.     

काय केले संशोधकांनी ?
मानवी जिनोमचा नकाशा तयार करताना एरवी दुर्लक्षित झालेले एपिजिनॉमिक्समधील भाग दृगोच्चर झाले आहेत, असे संशोधन गटातील डॉ. सॅखरॅम अकबरियन यांनी म्हटले आहे. प्रमस्तिष्कातील क्रोमॅटिन धाग्यांचे छोटे तुकडे वेगळे करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले