News Flash

देशात नवी वाहतूकदंड आकारणी सोमवारपासून

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता कित्येक पटीने वाढवण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.

नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता कित्येक पटीने वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयांऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल.

कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या ६५ टक्के आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली.

वाहतूक नियम अधिक कठोर

नियमभंग जुना दंड  नवा दंड (रु.)

* रस्ते नियमांचा भंग १०० ५००

* प्रशासनाचा आदेशभंग   ५०० २,०००

* परवाना नसलेले वाहन चालवणे ५०० ५,०००

* पात्र नसताना वाहन चालवणे  ५०० १०,०००

* वेगमर्यादा तोडणे   ४०० २,०००

* धोकादायक वाहन चालवणे १,०००   ५,०००

* दारू पिऊन वाहन चालवणे २,०००   १०,०००

* वेगवान वाहन चालवणे  ५०० ५,०००

* विनापरवाना वाहन चालवणे   ५,००० १०,०००

* सीटबेल्ट नसणे    १०० १,०००

* दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती १०० २,०००

* अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे -१०,०००

* विमा नसताना वाहन चालवणे     १,०००    २, ०००

* अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा    —  २५,००० व

मालक – पालक दोषी.         ३ वर्षे तुरुंगवास

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:28 am

Web Title: new transportation charges starting monday abn 97
Next Stories
1 काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी ६ सप्टेंबरला
2 पाकिस्तानला भरणार धडकी; भारतीय वायुसेना ३३ लढाऊ विमानं खरेदीच्या तयारीत
3 भन्नाट! इस्रायलने बनवली शत्रूच्या ड्रोनवर नियंत्रण मिळवण्याची टेक्नॉलॉजी
Just Now!
X