03 June 2020

News Flash

फेसबुकवरील आक्षेपार्ह छायाचित्राप्रकरणी विद्यार्थ्यांचे घुमजाव

येथील एका महाविद्यालयातील वर्गात मुले काही मुलींसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे फेसबुकवर टाकण्यात आलेले छायाचित्र संगणकाचा वापर करून तोडमोड करून टाकले आहे,

| February 26, 2015 12:46 pm

येथील एका महाविद्यालयातील वर्गात मुले काही मुलींसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत  असल्याचे  फेसबुकवर टाकण्यात आलेले छायाचित्र संगणकाचा वापर करून तोडमोड करून टाकले आहे, ते खरे नसून बनावट आहे, असा दावा त्यांच्यापैकी एका मुलीने केला आहे. दरम्यान  मुलीला अगदी खेटून झोपलेल्या मुलांचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याबद्दल सहा मुलांवर निलंबनाची कारवाई संबंधित महाविद्यालयाने केली आहे.
सुरतकल पोलीस स्टेशनला याबाबत एका मुलीने तक्रार नोंदवली होती त्यात असे म्हटले होते की, आपले फेसबुक खाते हॅक करून त्यात आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले.
तिने सांगितले की, एका सहकारी विद्यार्थ्यांने हे छायाचित्र १८ फेब्रुवारीला काढले होते व नंतर फेसबुकला टाकले होते. तिने असा दावा केला की, खोडसाळपणा करणाऱ्यांनी आपले फेसबुक खाते हॅक केले व त्याची तोडमोड करून ते पुन्हा फेसबुकवर टाकले. त्याचा गैरवापर करण्यात आला.
विद्यार्थ्यांवर कारवाई
सुरतकल पोलीस सूत्रांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून तपास चालू आहे. या घटनेने वाद झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालय अधिकाऱ्यांना संबंधित विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची मागणी केली.
त्यानुसार सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाने या मुलांवर कारवाईचा विचार सुरू केला आहे.
 या प्रकरणी महाविद्यालयाने म्हटले आहे की, या छायाचित्राच्या वादामुळे विद्यार्थी समुदायात भावनिक उद्रेक झाले. काही अज्ञात लोकांनी त्या विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली व आता त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2015 12:46 pm

Web Title: new twist to facebook photo case girl claims pic was doctored
टॅग Facebook
Next Stories
1 राहुल गांधी यांच्या सुटीमुळे तर्क-वितर्क
2 स्वाइन फ्लूच्या विषाणूची जनुकीय तपासणी आवश्यक
3 शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय विधेयक मंजूर करणे अयोग्यच
Just Now!
X