News Flash

Welcome 2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

आतषबाजी करत सर्वांनी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

भारतासह संपूर्ण जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये सर्वात प्रथम नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत झालं. तर त्यानंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

पाहूया नववर्षाच्या स्वागताची झलक

वाराणसीमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गंगेच्या आरतीनं करण्यात आली.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा ब्रिजचा नजारा

नववर्षाच्या स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं.

तुर्कस्थानात बॉस्फोरस स्ट्रेट येथं जोरदार आतषबाजीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

ग्रीसमध्येही मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

आर्क डी ट्रायंफमध्ये मोठ्या उत्साहात नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं.

नववर्षाच्या स्वागतासाठी बुर्ज अल खलिफालाही रोषणाई करण्यात आली होती.

नववर्षाचं स्वागत करताना उत्तराखंडमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी गाण्यावर ठेका धरला.

गेट वे ऑफ इंडियावरही मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात नववर्षांचं स्वागत केलं.

छत्तीसगढमधील रायपुर येथे सीआरपीएफच्या जवानांनी काही अशा प्रकारे नववर्षाचं स्वागत केलं.

थायलंडमध्ये आतषबाजी करत सर्वांनी नववर्षाचं स्वागत केलं.

हाँगकाँगमध्ये व्हिक्टोरिया हार्बर येथे आतषबासोबतच नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

जापानमध्येही मोठ्या उत्साहात लोकांनी नववर्षांचं स्वागत केलं.

मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रोषणाई करण्यात आली होती.

न्यूझीलंडमध्ये अशाप्रकारे करण्यात आलं नववर्षाचं स्वागत

सिडनीमध्ये आतषबाजी करत झालं नववर्षाचं स्वागत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 8:31 am

Web Title: new year 2020 celebrated worldwide welcomes jud 87 2
Next Stories
1 आजपासून रेल्वेची भाडेवाढ
2 पायाभूत सुविधा प्रकल्पांना बळ
3 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद न थांबल्यास ‘प्रतिव्यूहात्मक कारवाई’