न्यूयॉर्कमधील दोन इमारतींमध्ये वायुगळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात सातजण ठार आणि ६३ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून कोसळलेल्या या दोन इमारतींमधील नऊ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती महापौर बिल डे ब्लासिओ यांनी दिली.
इमारतीमध्ये वायुगळती झाल्यानंतर त्या परिसरात लागलेल्या आगीचे स्वरूप मोठे होते. या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे अधिकारी बुधवारी दुपापर्यंत झगडत होते. सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास स्फोट झाले आणि अवघ्या दोन मिनिटांत अग्निशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र, या स्फोटामुळे दोन इमारतींची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. वायुगळतीमुळेच प्रचंड स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.
 या दुर्घटनेमुळे अनेकांना ९/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली, तर काही जणांना भूकंपाचीच जाणीव झाली.