भारतातील लोकसभा निवडणुकांसंदर्भातील वार्तांकन करताना अमेरिकेतील ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने दोन गंभीर चुका केल्या आहेत. आपल्या वृत्तपत्रामध्ये तसेच ट्विटमध्येही ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या चुकी केल्या आहेत. भारतीय ट्विटर युझर्सने या चुका शोधून काढल्या आहेत. पहिली चूक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव नरेंद्र (Narendra) ऐवजी ‘नरंद्र’ (Narandra) असं लिहीलं आहे.

एका बातमीच्या मथळ्यामध्ये वृत्तपत्राने पुलवामा येथील आत्मघातील दहशवादी हल्ल्याचा उल्लेख ‘स्फोट’ असा केला आहे. “In India’s Election Season, an Explosion Interrupts Modi’s Slump” असा मथळा एका बातमीला देण्यात आला आहे. ४० हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वृत्तपत्राने ‘स्फोट’ म्हटल्याने भारतीय चांगलेच खवळले आहेत.

अनेकांनी ट्विटवरुन ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ला ‘स्फोट’ असेल तर ९/११ विमान अपघात होता का?’ असा सवाल विचारला आहे.

असंवेदनशील वार्तांकन

…मग अल-कादयाच्या कामगारांनाही श्रद्धांजली

यामुळे झाला ९/११ चा विमान अपघात

मग तो विमान अपघातच

अमेरिकन प्रसारमाध्यमांना आपल्याकडचे वार्तांकन नाही जमत

४० जणांचे प्राण गेलेत त्यात

मग शिरच्छेदाला काय म्हणणार माणसाचं डोकं हरवलं?

१४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या कारद्वारे जैश ए महम्मदच्या आदिल दार अतिरेक्याने पुलवामा जिल्ह्य़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए महम्मदच्या तळांवर २६ फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला होता.