News Flash

किशोरवयीन मुलांच्या कादंबरीवर न्यूझीलंडमध्ये बंदी

न्यूझीलंडमध्ये परीनिरीक्षण मंडळाने एका पुरस्कार विजेत्या कादंबरीवर बंदी घातली.

न्यूझीलंडमध्ये परीनिरीक्षण मंडळाने एका पुरस्कार विजेत्या कादंबरीवर बंदी घातली असून त्यात किशोरवयीन मुलांमधील लैंगिकता व एकमेकांना चिडवण्याचे रॅगिंगसदृश प्रकार यांचे वर्णन आहे. गेल्या दोन दशकात बंदी घालण्यात आलेले हे पहिलेच पुस्तक आहे. ऑकलंड येथील लेखक टेड दावे यांनी सांगितले की, ‘इनटू द रिव्हर’ या आपल्या कादंबरीला २०१३ मध्ये पुरस्कार मिळाला आहे पण आता त्यावर बंदी घालण्यात आल्याने गोंधळात पडल्यासारखे झाले आहे. ही कादंबरी अगदी वेगळी आहे असे त्यांनी न्यूझीलंड हेराल्डला सांगितले.
अगदी मोजक्या लोकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण पुस्तकांवर बंदी घालणाऱ्या देशात राहतो का, काही काळाने ते पुस्तकही जाळून टाकतील. या पुस्तकात एका माओरी मुलाची गोष्ट आहे. त्याला ऑकलंड बोर्डिग स्कूलची शिष्यवृत्ती मिळालेली असते पण त्याला वंशवाद व अमली पदार्थाच्या प्रश्नांशी झगडावे लागते. परीनिरीक्षण मंडळाशी अनेक वादविवाद होऊन आता बंदी घातली असल्याने हे पुस्तक विकल्यास व्यक्तींना ३००० न्यूझीलंड डॉलर दंड होणार आहे तर कंपन्यांना १० हजार डॉलर्स दंड होणार आहे. चित्रपट व साहित्य परीनिरीक्षण मंडळाने ही बंदी तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. त्यावर पुढील महिन्यात पुन्हा विचार केला जाणार आहे. १९९३ मध्ये कायदा लागू झाल्यानंतर कुठल्याही पुस्तकावर बंदी घातली गेली नव्हती. फॅमिली फर्स्ट न्यूझीलंड या गटाने आक्षेप घेतल्याने ही बंदी घालण्यात आली. या पुस्तकात लैंगिक कृत्याचे व अंमली पदार्थ सेवनाचे वर्णन आहे. न्यूझीलंडमधील आईवडिलांकडून मंडळाकडे तक्रारीचे ४०० इमेल आले होते त्यांचा आदर करून निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले, ही बंदी गोंधळात टाकणारी असल्याचे पुस्तकविक्रेत्यांचे प्रतिनिधी लिंकन गॉल्ड यांनी सांगितले. या पुस्तकात आक्षेपार्ह काही नाही, तज्ज्ञांनी ते गौरवले आहे. न्यूझीलंडमध्ये हे घडत आहे याची चिंता वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 1:18 am

Web Title: new zealand bans award winning teenage novel after outcry from christian group
Next Stories
1 ‘यांत्रिक बाहू’ बनवण्यासाठी नासाचा प्रकल्प
2 सतत बावीस दिवस ऑनलाइन गेम खेळणाऱ्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू ; रशियातील घटना
3 एफटीआयआय आंदोलनात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; जनहित याचिका फेटाळली
Just Now!
X