05 March 2021

News Flash

#NewYear2019 : आतषबाजीत न्युझिलंडमध्ये नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत

भारतापासून न्युझिलंडच्या वेळेमध्ये साडेसात तासांचा फरक आहे. न्युझिलंडचे घड्याळ हे भारताच्या पुढे आहे. त्यामुळे सध्या भारतात पाच वाजले आहेत तर न्युझिलंडमध्ये मध्यरात्रीचे साडेबारा वाजले आहेत.

न्युझिलंडमधील ऑकलंड येथे नव्या वर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे.

सरत्या वर्षातील शेवटचा सुर्यास्त काही वेळातच होणार आहे, त्यानंतर मध्यरात्रीनंतर नव्या वर्षाची पहाट होईल. मात्र, न्युझिलंडमध्ये नव्या वर्षाची मध्यरात्र उलटली असून इथल्या जनतेनं नव्या २०१९वर्षांच जल्लोषात स्वागत केलं आहे.


पूर्वेकडील देशांमध्ये एकामागून एका काही वेळांच्या फरकाने नव्या वर्षातला पहिला दिवस उजाडणार आहे. त्यामुळे हळूहळू सगळीकडे जल्लोषाला सुरुवात होईल. मात्र, जगात पहिल्यांदा हा नवा दिवस (मध्यरात्र) न्युझिलंडमधील ऑकलंड येथे झाली असून तेथे जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

ऑकलंडमधील ठिकठिकाणी उंच इमारती, पुल आणि सार्वजनिक ठिकाणी लोक अंधाऱ्या रात्री आकाशात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करीत आहेत. त्याचबरोबर तरुणाईसोबतच अबालवृद्धांनी चौका-चौकांमध्ये जमण्यास सुरुवात केली असून डान्स आणि पार्ट्यांसोबत नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे.

भारतापासून न्युझिलंडच्या वेळेमध्ये साडेसात तासांचा फरक आहे. न्युझिलंडचे घड्याळ हे भारताच्या पुढे आहे. त्यामुळे सध्या भारतात पाच वाजले आहेत तर न्युझिलंडमध्ये मध्यरात्रीचे साडेबारा वाजले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी ही वेळ हळूहळू भारताच्या बाजूला सरकणार आहे. तसतसा न्युझिलंडचा दिवस पुढे जात राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 5:08 pm

Web Title: new zealands auckland welcomes the new year with fireworks ahead of new year 2019
Next Stories
1 सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्यावरुन खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
2 मोहन भागवतांच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी
3 वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये ३११ दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X