News Flash

अमेरिकेत प्लास्टिकच्या पिशवीत सापडले नवजात अर्भक; नाव ठेवले ‘बेबी इंडिया’

पोलिसांनी मंगळवारी या बचाव मोहिमेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करुन अर्भकाच्या आईला शोधण्यासाठी लोकांना माहिती देण्याचे आवाहन केले.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात ६ जून रोजी रात्री दहा वाजता काही तासांपूर्वीच जन्मलेले एक स्त्री अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्याच्याकडेला पोलिसांना सापडले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या अर्भकाचे पोलिसांनी ‘बेबी इंडिया’ असे नावही ठेवले. मात्र, या अर्भकाला असे नाव का देण्यात आले याची माहिती कळू शकली नाही. पोलिसांनी मंगळवारी या बचाव मोहिमेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करुन अर्भकाच्या आईला शोधण्यासाठी लोकांना माहिती देण्याचे आवाहन केले.

पोलिसांना रस्त्याच्याकडेला सापडलेले स्त्री अर्भक आणि पोलिसांनी त्याचा केलेला बचाव याचा व्हिडिओ सोशल मीडियातूनही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या ट्रेंन्डिगमध्ये असून लोकांनी ‘बेबी इंडिया’ या हॅशटॅगने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करीत पोलिसांना त्याच्या आईचा पत्ता शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करीत आहेत.

एएफपी न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, पोलिसांना जॉर्जियातील जंगल भागात रस्त्याच्याकडेला एका नवजात बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी तिथे पडलेली एक प्लास्टिकची पिशवी उघडून पाहिली त्यात त्यांना स्त्री अर्भक आढळून आले. या अर्भकाची नाळही गळून पडलेली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी त्याला जॉर्जियाच्या डिपार्टमेंट ऑफ फॅमिली अॅण्ड चिल्ड्रन सर्विसेस येथे सुपूर्द केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:07 pm

Web Title: newborn infant found in a plastic bag in america named baby india aau 85
Next Stories
1 ‘सकाळी ९ वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा’
2 नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीची स्विस बँकेतली चार खाती गोठवली, ईडीचा दणका
3 मिठीत बाप-लेकीचा अंत! मृतदेहाचा फोटो पाहून संपूर्ण जग हळहळलं
Just Now!
X