आसामचे नवनियुक्त उपसभाती कृपानाथ मल्ला हत्तीवरून पडले. उपसभापती म्हणून निवडून आल्याने त्यांचे अनेक चाहते त्यांचे स्वागत करत होते. निवडून आल्याच्या आनंदात रताबारी या त्यांच्या मतदार संघातून हत्तीवर बसून फिरत होते. त्यांची मिरवणूक मोठ्या हौशीनं काढण्यात आली होती. मात्र ते अचानक कोसळले. या घटनेत त्यांना फारशी इजा झाली नाही. ६ ऑक्टोबरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.