न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्याआधी गुरुत्वाकर्षण अस्तिवात होते. न्यूटनच्या आधी हजारो वर्षापूर्वी भारतातील हिंदू ग्रंथामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. अॅटम आणि मॉलिक्यूलचा अविष्कार ऋषि प्रणव यांनी केल्याचा दावाही रमेश पोखरियाल यांनी केला आहे. शनिवारी दिल्लीमध्ये आरएसएसने आयोजित केलेल्या ज्ञानोत्सव कार्यक्रमात रमेश पोखरियाल बोलत होते. कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमात बोलताना रमेश पोखरियाल यांनी आयआयटी आणि एनआयटीला संस्कृत भाषेवर अभ्यास करण्याचा टास्क दिला आहे. संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. संस्कृत भाषेचे महत्व आपण सिद्ध करू शकलो नाही, त्यामुळे आपल्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. आयआयटी आणि एमआयटीच्या कुलगुरू आणि प्राचार्यांना यावर अभ्यास करण्याची विनंती करतो. त्यांनी संस्कृत भाषा वैज्ञानिक असल्याचे सिद्ध करावे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newton didnt indian scriptures first mentioned gravity says hrd minister nck
First published on: 18-08-2019 at 11:39 IST