27 September 2020

News Flash

‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात

या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला उडता पंजाब या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.
‘उडता पंजाब’ या चित्रपटातील एक दृश्य वगळण्यासह सुधारित वैधानिक इशारा देण्याचे स्पष्ट करीत चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) तडाखा दिला होता. तसेच ४८ तासांमध्ये चित्रपटाला नवे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने मंडळाला दिले. चित्रपटाची प्रसिद्धी- वितरणावर निर्मात्यांनी कोटय़वधी रुपये खर्च केलेले आहेत, असे नमूद करीत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मंडळाची मागणीही उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2016 12:39 pm

Web Title: ngo moves supreme court challenging the bombay hc order on the film udta punjab
Next Stories
1 दिघ्यातील बेकायदा इमारतींच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती
2 Facebook launches suicide prevention tools:आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचे नवे टूल!
3 Polio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू
Just Now!
X