22 March 2019

News Flash

मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होतं का ? हरित लवादाचा तपासाचा आदेश

स्वयंसेवी संस्था अखंड भारत मोर्चाने मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार करणारी याचिका केली आहे

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पूर्व दिल्लीमधील सात मशिदींवर लागलेल्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असलेल्या तक्रारीची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. एनजीटीने दिल्ली सरकारसहित दिल्ली आणि केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना या मशिदींची पाहणी करण्याचा आदेश दिला आहे. जर खरंच या मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी असं आदेशात म्हटलं आहे. नवभारत टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

स्वयंसेवी संस्था अखंड भारत मोर्चाने ही याचिका केली आहे. याचिकेत त्यांनी पूर्व दिल्लीमधील सात मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरच्या बेकायदा वापरामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या मशिदी अशा परिसरात आहेत जिथे शाळा आणि रुग्णालयं आहेत. लाऊडस्पिकरचा आवाज हा मर्यादेपेक्षा जास्त असतो असंही याचिकेत म्हटलं आहे.

एनजीटी अध्यक्ष जस्टिस आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने मशिदींकडून होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी मिळूनही दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही यावर आश्चर्य व्यक्त केलं. एनजीटीने हा मुद्दा गांभीर्याने घेत तपासणी कऱण्याचा तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

First Published on August 11, 2018 10:38 am

Web Title: ngt orders to check noise pollution of mosques