लोकसभेत सोमवारी एनआयए संशोधन विधेयक 2019 पारित करण्यात आले. मोठ्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकामुळे एनआयएची कक्षा रूंदावणार आहे. दरम्यान, आज संपूर्ण जगाला आणि भारताला दहशतवादाचा सामना करायचा असल्याचे गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. तपास यंत्रणांना अधिक सक्षम करणं हे या विधेयकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

काय आहेत महत्त्वाच्या बाबी

या विधेयकामुळे एनआयएच्या कक्षा देशातच नाही तर देशाबाहेरही रूंदावणार आहेत. देशाबाहेर भारतीयांवर दहशतवादी हल्ले झाल्यास, तसेच भारतीय हितसंबंध असलेल्या ठिकाणी हल्ले झाल्यास सदर ठिकाणी एएनआयला तपास करता येणार आहे. दरम्यान, एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला आपण दहशतवादी नसल्याचेही सिद्ध करावे लागणार आहे.

एनआयएला दहशतवादा व्यतिरिक्त मानवी तस्करीशी निगडीत तपासाचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही विधेयकात म्हटले आहे.

एनआयएला अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना आता सायबर गुन्ह्यांचाही तपास करता येणार आहे.

भारताबाहेर भारतीय नागरिकांविरोधात तसेच भारताचे भारताचे हितसंबंध बिघडतील अशी कृती करणाऱ्यांविरोधातही एनआयएला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

एनआयएला बनावट नोटांसंबंधीत गुन्ह्यांच्या तपासाचेही अधिकार देण्यात आले आहेत.

एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स अॅक्ट, 1 9 08 च्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांच्या तपासणीसाठी एनआयएला सक्षम करण्यात आले आहे.

हत्यारांची निर्मिती आणि त्यांच्या विक्री संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही आता एनआयएला करता येणार आहे.

एनआयएच्या कक्षेत येणारे गुन्हे किंना अन्य गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी अति महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकावर सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. 278 विरूद्ध 6 मतांनी हे विधेयक पारित करण्यात आले.