समाजमाध्यमांसह इंटरनेटवरील इतर व्यासपीठांचा वापर करून देशाविरुद्ध ‘युद्ध छेडल्याच्या’ आरोपाखाली काश्मीरमधील पाकिस्तानधार्जिण्या फुटीरतावादी नेत्या आणि दुख्तरान-इ-मिल्लत संघटनेच्या प्रमुख आसिया अंद्राबी व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) बुधवारी आरोपपत्र दाखल केले.

आसिया अंद्राबी, सोफी फहमिदा व नाहिदा नसरीन या ट्विटर, फेसबुक, यूटय़ूब आणि पाकिस्तानातील काही वाहिन्यांसह दूरचित्रवाहिन्या अशा माध्यमांचा वापर करून भारताविरुद्ध विद्रोही आरोप, तसेच द्वेषपूर्ण संदेश व भाषणे यांचा प्रसार करत आहेत, असे एनआयएच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले.

दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्यात आलेली दुख्तरान-इ-मिल्लत ही संघटना अंद्राबी व इतरांच्या माध्यमातून हिंसक मार्गाने जम्मू- काश्मीर भारतातून फुटून बाहेर पडण्याचे आणि पाकिस्तानात विलीन होण्याचे खुलेआम समर्थन करत असते.