राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) एका कॉन्स्टेबलला तब्बल दीड कोटी रूपयांच्या बनावट नोटांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या बनावट नोटा अशातच हरियाणातील गुरूग्राम येथे करण्यात आलेल्या छापेमारीनंतर या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. ज्या एनआयए कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

एनआयए सारख्या संस्थेतच चोरीची घटना घडल्यामुळे तेथील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या आरोपीने आपल्या प्रेयसीच्या घरातच पैसे लपवून ठेवले होते, ज्या ठिकाणाहून दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ते जप्त केले.

दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हा दाखल केला, यानंतर पैसे जप्त करत या प्रकरणातील अन्य दोन आरोपींनाही अटक केली. आता सर्व आरोपी तुरूंगात आहेत. बनावट नोटांशी निगडीत एका आणखी हायप्रोफाइल प्रकरणाचा या घटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.