18 January 2021

News Flash

भीमा कोरेगाव: NIA कडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात FIR

NIA ची मोठी कारवाई

भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आजच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आज आठ जणांविरोधात FIR दाखल केला आहे.  एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे असा पुणे पोलिसांचा आरोप आहे. ज्याभोवती प्रश्नांचं काहूर उठलं आहे.

पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली. त्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली. आज या प्रकरणी NIA ने आज आठ जणांना अटक केली. इतर संघटनांना पुढे करुन एल्गार परिषद ही केवळ चेहरा होती त्यामागून हे माओवादी कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते असाही आरोप आहे. एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आणि कबीर कलामांचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली. समाजात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्यं करुन पत्रकं आणि पुस्तिका वितरित केल्या असंही पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 4:25 pm

Web Title: nia files chargesheet against 8 persons including anand teltumbde gautam navlakha in bhima koregaon case scj 81
Next Stories
1 गुजरातमध्ये यंदाची नवरात्र गरब्याविनाच
2 Nobel Peace Prize 2020 : कोणीही उपाशी झोपू नये म्हणून संघर्ष करणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान
3 पुन:श्च हरिओम: शनिवारपासून ट्रम्प यांच्या प्रचारसभा सुरू
Just Now!
X