News Flash

यासिन भटकळविरोधात आणखी एक आरोपपत्र

देशात दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ

| February 21, 2014 02:34 am

देशात दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ आणि त्याचा निकटचा साथीदार असद उल्ला अख्तर या दोघांविरोधात गुरुवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले.
न्या. आय. एस. मेहता यांच्या जिल्हा न्यायालयात या संबंधातील हे पूरक आरोपपत्र दाखल केले गेले. या प्रकरणी २४ फेब्रुवारीला सुनावणी आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे की, भटकळ याने आपल्या अन्य साथीदारांसह देशाच्या अनेक भागांत छुपे गट आणि घातपाती गट स्थापन केले होते. यातील काही गट दिल्ली, बिहारमधील दरभंगा, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नांदेड तसेच कर्नाटकातील भटकळ आणि हैदराबाद येथे कार्यरत होते.भटकळ आणि अख्तर याला गेल्या वर्षी २८ ऑगस्टला भारत-नेपाळ सीमेवर अटक झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 2:34 am

Web Title: nia files second chargesheet against yasin bhatkal for terror attacks
टॅग : Yasin Bhatkal
Next Stories
1 उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
2 पाक लष्कराच्या हवाई हल्ल्यात ४० अतिरेकी ठार
3 सिंगापूरमधील दंगलीप्रकरणी तिसऱ्या भारतीय नागरिकास शिक्षा
Just Now!
X