पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाटण्यात २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘हुंकार’ मेळाव्यात स्फोटमालिका घडविणाऱ्या ११ आरोपींविरुद्ध मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. सदर आरोपी इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या संघटनांचे सदस्य असल्याचा संशय आहे.
या स्फोटांच्या मालिकेत सहा जण ठार झाले होते, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. आरोप निश्चित करण्यात आल्याने आरोपींवरील कारवाईला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. येत्या १९ जानेवारीपासून साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश विशेष न्यायालयाचे न्या. अनिलकुमार सिंह यांनी दिले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्या हिताला बाधा येईल असे वाटून आरोपींनी सभास्थानाची रेकी केली आणि स्फोट घडविले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2015 12:41 pm