मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत नेते एस.ए.एस गिलानी, नईम खान, फारुख अहमद डार या नेत्यांना होणाऱ्या फंडिगची (आर्थिक रसद) राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) चौकशी करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले. त्यांनी मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून फुटीरतावादी नेते एस. ए. एस. गिलानी, नईम खान आणि फारुख अहमद डार यांच्यासह इतरांना पुरवण्यात येणाऱ्या आर्थिक रसदीसंबंधी प्राथमिक चौकशी केली. त्यामुळे आगामी काळात दहशतवाद्यांकडून फुटीरतावादी नेत्यांना होणाऱ्या आर्थिक रसदीवर तपास यंत्रणांची करडी नजर राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.