News Flash

‘नरेंद्र मोदीच होते निशाण्यावर’

पाटणा बॉम्बस्फोटाप्रकरणी काल (बुधवार) रांचीतून अटक करण्यात आलेल्या चौघांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच होते असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे.

| May 22, 2014 11:33 am

पाटणा बॉम्बस्फोटाप्रकरणी काल (बुधवार) रांचीतून अटक करण्यात आलेल्या चौघांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच होते असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे.
बिहारमधील पाटणा येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेच्यावेळी गेल्यावर्षी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बुधवारी रांची येथून दर अली उर्फ ब्लॅक ब्युटी हा म्होरक्या, तौफिक अन्सारी, मोजिबुल्ला व नुमान अन्सारी यांना ‘एनआयए’ने अटक केली.
एनआयएचे महासंचालक शरद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात झालेल्या मोदींच्या सभा आणि मोदींना लक्ष्य करण्याचे ध्येय या अटक करण्यात आलेल्या चौघांचे होते. ज्या-ज्या ठिकाणी मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा यांचा इरादा होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणे त्यांना जमले नाही अखेर पाटणायेथील सभेतील काही सुरक्षा त्रुटींमुळे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा त्यांचा हेतू साध्य झाला. असेही शरद कुमार म्हणालेत.
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पाटणा स्फोट प्रकरणाची उकल केली असून बिहारमध्ये गेल्यावर्षी अटक करण्यात आलेल्या यासिन भटकल याने दिलेल्या माहितीच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 11:33 am

Web Title: nia says modi was target of patna blasts arrests four
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 राहुल गांधींना सल्ला देणाऱयांमुळे काँग्रेस पराभूत- मिलिंद देवरा
2 थायलंडमध्ये लष्करी राजवट लागू
3 नवाझ शरीफ यांना निमंत्रण दिल्यामुळे ‘भाजप’चा दुटप्पीपणा उघड- मनिष तिवारी
Just Now!
X