News Flash

बिहार-बोधगया परिसरात नऊ बॉम्बस्फोट; पाच जखमी

बिहार मधील बोधगया येथे आज रविवार पहाटे पाचच्या सुमारास नऊ साखळी बॉम्बस्फोट झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या स्फोटांमध्ये पाच जण जखमी

| July 7, 2013 09:49 am

बिहार मधील बोधगया  येथे आज रविवार पहाटे पाचच्या सुमारास नऊ साखळी बॉम्बस्फोट झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या स्फोटांमध्ये पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये बौद्ध भिक्षुकांचा समावेश आहे.  हे बॉम्ब बोधगया येथील बोधीवृक्ष, दीपघर, तारादेवा, मंदिराच्या बागेत आणि प्रसिद्ध ८० फूट उंचीच्या भगवान बुद्धांच्या भव्य मुर्तीच्या परिसरात झाले आहेत.
बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास महाबोधी मंदिराच्या परिसरात साखळी बॉम्बस्फोट झाले असले तरी, मंदिराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तसेच जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.
बॉम्बस्फोट झाल्याची माहितीमिळताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार घटनास्थळी रवाना झाले. झालेले बॉम्बस्फोट निंदनीय असल्याचे नितीश कुमारांनी म्हटले. त्याचबरोबर या परिसरातून आणखी दोन जिवंत बॉम्ब आढळून आले. ते निकामी करण्यात आले असल्याचेही नितीश कुमार म्हणाले.
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर हा बॉम्बस्फोट दहशतवादी कृत्य असल्याचा खुलासा केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 9:49 am

Web Title: nine blasts rock temple town bodhgaya in bihar five injured
Next Stories
1 गोव्यातील घोटाळ्यांची चौकशी केल्यास निम्मे अधिकारी तुरुंगात, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट
2 ईशान्य नायजेरियात २९ विद्यार्थ्यांची हत्या
3 नितीशकुमार यांच्याशी जवळीक साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, बिहारला केंद्रीय योजनेतून मदत
Just Now!
X