26 September 2020

News Flash

तृणमूलच्या विजयी मेळाव्यात स्फोटामध्ये नऊ जण जखमी

उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील किपालपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या विजयी मेळाव्यात काही अज्ञात इसमांनी बॉम्ब फेकले

| May 29, 2016 01:02 am

उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील किपालपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या विजयी मेळाव्यात काही अज्ञात इसमांनी बॉम्ब फेकले त्यामध्ये सहा मुलांसह नऊ जण जखमी झाले आहेत.
तृणमूलच्या विजयी मेळाव्यात फेकण्यात आलेल्या बॉम्बमुळे तेथे उभे असलेले पक्षाचे तीन कार्यकर्ते आणि सहा मुले जखमी झाली. त्यापैकी एक कार्यकर्ता आणि एका मुलास बशीरहाट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अन्य जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
बॉम्ब फेकून पसार होणाऱ्या अज्ञात इसमांचा पोलीस कसून शोध घेत असून त्यांची ओळख पटविण्याच्या दृष्टिकोनातून चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:02 am

Web Title: nine injured in blast in trinamool victory rally
Next Stories
1 पुद्दुच्चेरीत नारायण सामी यांच्या निवडीनंतर गदारोळ
2 हिजबूलच्या दहशतवाद्याला पुलवामा जिल्ह्य़ातून अटक
3 अमेरिकेत शिकायला गेलेला आंध्रचा विद्यार्थी ‘आयसिस’च्या दृश्यचित्रफितीत
Just Now!
X