मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाने पूर्व चीनला झोडपले असून या नैसर्गिक आपत्तीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. पावसामुळे या भागातील जमीन खचली असून काही घरेही कोसळली आहेत.
बीजिंगमधील माध्यमांनी या घटनेची माहिती दिली आहे. झेजिंग प्रांतातील वेंझोऊ शहरात मृतांमधील काही जण घरे कोसळल्याने गाडले गेले असून काही जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती क्सिनहुआ वृत्तवाहिनीने दिली आहे. येथील पूर नियंत्रणात असून मदतकार्य वेगात सुरू आहे. तैवानमधील शनिवारी आलेल्या सौडलर चक्रीवादळात ६ जणांचा मृत्यू झाला असून १०२ जण जखमी झाले आहेत. सौडलर चक्रीवादळाने झेजिंग आणि जिआंग्सी या प्रांतात आगेकूच केली आहे. येथील हवामान खात्याने हे वादळ पुढील २४ तासांत वेनचेंग प्रांतात धडकण्याची शक्यता आहे. गेल्या शंभर वर्षांतील हे सर्वात मोठे चक्रीवादळ आहे.