26 September 2020

News Flash

बिहारमध्ये भरधाव जीपने विद्यार्थ्यांना चिरडले; ९ जणांचा मृत्यू, २४ जखमी

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील हृदयद्रावक घटना

मुजफ्फरपूर : भरधाव जीपने विद्यार्थ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर शाळेच्या परिसरात गोळा झालेले पालक.

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एक भरधाव वेगाने जाणारी बोलेरो जीप शाळेत घुसऱ्याने ९ विद्यार्थ्यांचा मृत्य़ू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. त्याचबरोबर २४ विद्यार्थ्यांसह काही महिलाही या भीषण अपघातात जखमी झाल्या असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.


माध्यमांतील वृत्तानुसार, मुजफ्फरपूरमधील अहियापूरच्या झपहा येथे एका शाळेच्या परिसरात ही घटना घडली. सकाळची शाळा दुपारी सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जायला निघाले होते. यावेळी शाळेच्या इमारतीच्या जवळून जाणारा रस्ता ओलांडताना बाजूने एक भरधाव वेगाने बोलेरो जीप जात होती. ती थेट शाळेच्या सीमाभिंतीला धडकली दरम्यान, हे वाहन विद्यार्थ्यांना चिरडून पुढे गेले. त्यानंतरही ही जीप थांबली नाही, पुढे येणाऱ्या सर्वांना चिरडत ती पुढे गेली, यामुळे यात अनेकजण जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे परिसरात मोठा हल्लकल्लोळ माजला, आपल्या मुलांना घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांसमोर ही घटना घडल्याने ते चिडलेल्या अवस्थेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:31 pm

Web Title: nine students dead 24 injured after a vehicle rammed into a school building in bihars muzaffarpur
Next Stories
1 पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी म्हणतो असा मी काय गुन्हा केला?
2 ओरिएन्टल बँकेतही ३९० कोटींचा घोटाळा, ज्वेलरी निर्यातदाराने लावला चुना
3 पोलिसांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर माझ्या एन्काऊंटरची चर्चा; जिग्नेश मेवाणींचा आरोप
Just Now!
X