News Flash

‘ती’ नोटीस जारी झाली तर १९० देशाच्या पोलिसांना मिळणार नीरव मोदीला अटक करण्याचा अधिकार

नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सीविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेत १३,५७८ कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सीविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी नुकतीच विनंती करण्यात आली असून यामुळे १९० देशांचे पोलीस नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला शोधून अटक करु शकतात.

सीबीआयच्या विनंतीवर इंटरपोल लवकरच निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली. ब्रिटन सरकारने भारत सरकारला विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि अन्य आरोपींच्या प्रत्यार्पणात भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याच्या वृत्ताला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम १४ मे रोजी नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याचे म्हटले होते. नीरव मोदींच्या ठावठिकाण्याबाबत मुख्य तपास यंत्रणा सीबीआयने अजून काहीही स्पष्ट केलेले नाही.

भारतीय तपास यंत्रणा नीरव मोदीच्या शोधात आहेत. रॉयटर्सने जेव्हा ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क साधला तेव्हा एखाद्या विशेष व्यक्तीची माहिती देऊ शकत नसल्याचं सांगत माहिती देण्याचं टाळण्यात आलं. रिपोर्टनुसार, नीरव मोदीने राजकीय छळ झाल्याचा आरोप करत ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. नीरव मोदीव्यतिरिक्त बँकांना हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला विजय मल्ल्याही लंडनमध्ये असून त्यालाही पुन्हा भारतात आणण्याचा दबाव भारत सरकारवर आहे.

नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेने लूकआऊट नोटीसही जारी केली होती. पोलिसांनी एकूण २५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये नीरव मोदी, मेहुल चोकसी, दोन बँक संचालक आणि नीरव मोदीच्या कंपनीतील तिघांचा समावेश होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 7:30 pm

Web Title: nirav modi cbi red corner notice interpol
टॅग : Cbi
Next Stories
1 वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये
2 पती-पत्नीच्या चारित्र्यावर निराधार शंका उपस्थित करणे क्रूरता: हायकोर्ट
3 ट्रम्प-किम भेट यशस्वी ठरली तर अमेरिकन सैन्य पोहोचेल चीनच्या दारापर्यंत
Just Now!
X