कर्ज फसवणूक प्रकरणात हात पोळलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने हिरे व्यापारी नीरव मोदीला व्यापारी बँकेने सुमारे २५ हजार कोटी रुपयांची हमी पत्रे दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

बँकेने नेमलेल्या बेल्जियमच्या न्यायवैद्यक लेखा परिक्षण आयोगाच्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली आहे. नीरव मोदीविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने फेब्रुवारी २०१८ अखेरच्या माहितीनुसार, सुमारे नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना पंजाब नॅशनल बँकेने २५ हजार कोटी रुपयांचे १,३८१ हमी पत्रे जारी केले. नीरव मोदी व त्याचे व्यावसायिक निर्यातदार यांना ही हमीपत्रे दिली गेली आहेत. एकूण २८,००० कोटी रुपयांची १,५६१ हमी पत्रे बँकेने जारी केल्याचे सांगितले जाते. लेखापरिक्षण आयोगाने नीरव मोदी, त्याच्या कंपन्या आदींना दिलेल्या हमीपत्रांची माहिती घेऊन अहवाल सादर केला आहे. या ३२९ पानांच्या अहवालात आयोगाला आढळलेल्या याबाबतच्या व्यवहारांचा अनेक तपशील नोंदविला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभाग तसेच सक्तवसुली संचालनालय यांच्या व्यतिरिक्त तपास यंत्रणांनी जमा केलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. नीरव मोदीच्या मालकीच्या पाच महागडय़ा कार, बोटी यांचाही उल्लेख याबाबतच्या अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या २० कोटी रुपये किंमतीच्या चित्रांचाही समावेश आहे.