केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सकाळी विस्तार झाला. यामध्ये खासदार निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे देशाला आता पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर सीतारामन या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जगातल्या १५ देशांचे संरक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या महिलांबाबतचे विशेष वृत्त.

निर्मला सीतारामन यांची भारताच्या संरक्षणमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचा आता जगभरातील महिला संरक्षणमंत्र्यांच्या छोट्या गटामध्ये समावेश झाला आहे. मात्र, त्याचबरोबर देशातील पुरुष संरक्षणमंत्र्यांचा क्लबही त्यांनी मोडून काढला आहे. याबाबात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष असते. त्यामुळेच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांकडे नवी आणि महत्वाची खाती सोपवली आहेत. असे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर प्रतिक्रिया देताना अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

भारताबरोबर सध्या जर्मनी, नॉर्वे आणि नेदरलँड या देशांच्या संरक्षणमंत्रीपदी महिला कार्यरत आहेत. तर ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ मध्ये पहिल्यांदाच संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी एका महिलेकडे सोपण्यात आली आहे. इतरही काही देशांच्या संरक्षणमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी महिलांवर आहे. जाणून घेऊयात या पावरफुल महिलांबाबत…

अर्सुल वोन डेर लायन (Ursula von der Leyen) : जर्मनी

शेख हसीना (Sheikh Hasina) : बांगलादेश

जीनिन हेन्सिस-प्लासचार्ट (Jeanne Hennis-Plasschaert) : नेदरलँड

फ्लॉरेन्स पॅले (Florence Parly) : फ्रान्स

रोबर्टा पिनोटी (Roberta Pinotti) : इटली

मराईज पेन (Marise Payne) : ऑस्ट्रेलिया

मारिया डोलोरेस डी कॉस्पाडल (Maria Dolores de Cospedal) : स्पेन

मार्था एलेना रुईझ सेविला (Martha Elena Ruiz Sevilla) : निकारागुआ

नोसीवीव मॅपिसा-नुकाकुला (Nosiviwe Mapisa-Nqakula) : दक्षिण अफ्रिका

ईने मेरी एरिक्सन सोराईड (Ine Marie Eriksen Soreide) : नॉर्वे

रेशेलेट ओमॅमो (Raychelle Omamo) : केनिया

मिमी कोडहेली (Mimi Kodheli) : अल्बानिया

मरिना पेंदे (Marina Pendes) : बोस्निया आणि हरझेगोविना

आंद्रेजा काटिक (Andreja Katic) : स्लोवेनिया

राधमिला सेक्रिन्स्का (Radmila sekerinska) : मॅकेडोनिया रिपब्लिक