28 September 2020

News Flash

अर्थसंकल्पापूर्वी निर्मला सीतारामन घेणार राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट

मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असेल.

देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर आता त्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सीतारामन 5 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असेल.

दरम्यान, 21 जून रोजी जीएसटी परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सामान्यांशी निगडीत वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच बिझनेस टू बिझनेस विक्रीसाठी 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी वेबसाईटवर इनव्हॉइस तयार करण्यावरही चर्चा केली जाणआर आहे. 1 एप्रिल 2020 पासून जीएसटी-ईवे बिल प्रणालीला ‘एनएचएआय’च्या फास्ट ट्रॅक प्रणालीमध्ये सामिल करण्याचाही समावेश बैठकीच्या अजेंड्यात करण्यात आला आहे. यामुळे वस्तूंच्या खरेदी विक्रीवर देखरेख ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच जीएसटीची चोरीही रोखण्यास मदत मिळणार आहे. जीएसटी परिषदेच्या या बैठकीत ‘एएआर’साठी राष्ट्रीय समितीच्या स्थापनेवरही चर्चा केली जाणार आहे. याद्वारे निरनिराळ्या राज्यांमध्ये एएआरद्वारे समान मुद्द्यांवर परस्पर विरोधी देण्यात आलेल्या निर्णयांचे समाधान मिळणार आहे.

1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू केल्यानंतर दोन वर्षांसाठी ‘एनएए’ची स्थापना करण्यात आली होती. जीएसटी दरांच्या कपातीचा लाभ ग्राहकांना न पोहोचवणाऱ्या कंपन्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी एनएएची स्थापना केली होती. याव्यतिरिक्त जीएसटी परिषद जीएसटी परताव्याची मंजुरी आणि त्याच्या तपासाच्या सिंगल पॉईंट सिस्टम व्यवस्थेवर विचार करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 5:46 pm

Web Title: nirmala sitharaman meet all state finance minister before budget gst council meeting jud 87
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार अद्यापही सुरु, गोळीबारात दोघांचा मृत्यू
2 पाकिस्तानी हेर ‘सेजल कपूर’ची ९८ भारतीय अधिकाऱ्यांच्या कंम्प्युटर्समध्ये घुसखोरी
3 काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? राहुल गांधींचा खुलासा
Just Now!
X