News Flash

फ्रान्सवां ओलाँ अडचणीत आलेले असताना राफेलबाबत वक्तव्य

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवाँ ओलाँ हे त्यांच्या सहकाऱ्याला काही कारणास्तव पैसे मिळाल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले असताना त्यांनी राफेल विमानखरेदी कराराबाबत वक्तव्य केले आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्थेतील कार्यक्रमानंतर (ओटीए) पत्रकारांशी बेलताना सीतारामन यांनी हे विधान केले.

राफेल करारात डिफेन्स ऑफसेट्सच्या गुंतवणुकीसाठी रिलायन्स कंपनीची निवड करण्यासाठी भारत सरकारनेच आग्रह केला होता, असे ओलाँ यांनी नुकतेच म्हटले होते. त्यावर सीतारामन यांनी म्हटले की, ओलाँ यांच्या सहकाऱ्याला काही कारणास्तव पैसे मिळाल्याचे आरोप होत आहेत. ते पैसे नेमके कोणत्या कारणासाठी मिळाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ओलाँ हे स्वत: अडचणीत आलेले असताना राफेल कराराबाबत वक्तव्य करत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे, असे सीतारामन म्हणाल्या.

त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल यांनी ओलाँ यांच्याबाबत सूचक ट्वीट आधीच केले होते. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू-काश्मीरमधील घुसखोरीवर नियंत्रण बसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्रे विकत घेण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 1:07 am

Web Title: nirmala sitharaman rafale deal scandals
Next Stories
1 वीज कायद्यातील प्रस्तावित सुधारणा धोकादायक
2 मालदीवच्या नेत्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठिंब्याचे आवाहन
3 पेहलू खान मृत्यू प्रकरणातील साक्षीदारांवर गोळीबार
Just Now!
X