पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यावधी रूपये बुडवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ केली आहे. गुरूवारी नीरव मोदीची व्हिडीओ द्वारे लंडनमधील मिनिस्टर न्यायालयात पेशी झाली.

याप्रकरणी सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सांगितले की, न्यायालय त्याच्याशी निगडीत कागदपत्रांना तुरूंगातच त्याला उपलब्ध करून देण्याच्या त्याच्या मागणीला सुविधाजनक बनवण्याचा प्रयत्न करेल. कारण नीरव मोदीच्या वकिलांनी त्याच्याविरोधात असलेल्या ५ हजार पानांच्या भारत सरकारच्या खटल्याचे त्याला तरूंगातच पुनरावलोकन करता यावे, यासाठी त्याला लॅपटॉप दिला जावा अशी मागणी केली होती.
या महिन्याच्या सुरूवातीलास लंडन न्यायालयाने नीरव मोदीचा जामीनाचा अर्ज फेटाळला होता. आतापर्यंत चारवेळा त्याचा जामीन अर्ज फेटाळल्या गेला आहे.