01 October 2020

News Flash

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी देण्यात आला पुरस्कार

पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान देण्यात आला आहे. शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी गिलानी यांनी ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार देण्यात आला. गिलानी हे फुटीरतावादी नेते असून त्यानी अनेकदा काश्मीरमध्ये भारतविरोधी वक्तव्यही केली होती. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं आपला नवा नकाशा जारी केला होता. त्यात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचंही दाखवण्यात आलं होतं.

स्वातंत्रदिनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्यात आला. माजी हुर्रियत नेते गिलानी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ रिझवी यांनी हा पुरस्कार दिला. दरम्यान, या कार्यक्रमाला गिलानी हे उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी काही हुर्रियतच्या नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी गिलानी यांना सन्मानित करण्यात येईल, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं होतं.

पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाद्वारे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. गिलानी यांनी काही दिवसांपूर्वीच हुर्रियतमधून आपला राजीनामा दिला होता. काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसेचा आरोप असलेल्या आरोपींमध्ये त्यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिसाचारानंतर टेरर फंडिंगचादेखील आरोप करण्यात आला होता. तर बऱ्याच कालावधीसाठी गिलानी यांना त्यांच्या घरात नजरकैदेतही ठेवण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 2:54 pm

Web Title: nishan e pakistan award conferred upon former hurriyet leader syed ali shah geelani pakistan pm imran khan jud 87
Next Stories
1 टाटा समूहाला एअर इंडिया विक्री प्रस्तावावर स्वामी भडकले; म्हणाले…
2 आनंदवार्ता… पहिल्या टप्प्यात भारतीय बनावटीची लस सुरक्षित असल्याचा दावा
3 करोनामुक्त रुग्णांना पुन्हा होतेय लागण, चीनने वाढवली जगाची चिंता
Just Now!
X