त्रिपुरा आणि आसाम यांना जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे केली. ईशान्येकडील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून सदर घोषणा करण्यात आली.
आसाममधील साबरूम ते कुकीतल आणि खोवाई उपविभागातून आगरतळा असे दोन राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केली जात होती, असे गडकरी म्हणाले. ‘भारतमाला’अंतर्गत हे महामार्ग बांधण्यात येणार असून त्याचे काम डिसेंबर २०१५ पूर्वी सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८०१.७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गडकरी म्हणाले. भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान यांच्यात रस्ताजोडणी करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.