केवळ राज्यातच नाहीत संपूर्ण देशभरात रस्ते, महामार्ग व उड्डाण पुलांचं जाळं निर्माण करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ओळखलं जातं. शिवाय, ते आपल्या या कामासाठी किती कटीबद्ध असतात हे देखील वेळोवेळी दिसून आलं आहे. याचबरोबर नितीन गडकरींचा स्पष्टवक्तेपणा देखील सर्वांना माहिती आहे, ते प्रसंगी भाजपा नेत्यांना देखील खडेबोल सुनावयला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच त्यांना माननारे भाजपा व्यतिरिक्त अन्य पक्षातही मोठ्यासंख्येने दिसतात. याच पार्श्वभूमीवर आज नितीन गडकरींच्या जीवनातील एक किस्सा सर्वांसमोर आला. जो त्यांनी स्वत: एका कार्यक्रमात सांगितला आहे. रस्ता कामात अडसर ठरत असल्याने त्यांनी स्वतःच्याच सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता.

हा किस्सा सांगताना नितीन गडकरी म्हणाले, “माझं नवीनच लग्न झालं होतं आणि माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मध्ये येत होते, रामटेकमध्ये तो रस्ता बनत होता. तर माझ्या पत्नीला न सांगता, सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवलं आणि रस्ता केला. आणि मग मला अधिकारी सांगत होते, की वहिनींच देखील घर इथंच कुठतरी बहुतेक आहे. रस्ता तयार करताना अडचण आली होती आणि तुम्ही सांगितलं की ते घर तोडाव लागेल. हेच नेत्यांनी करायला पाहिजे, अतिक्रमणाला वाचवण्याचं पाप नाही केलं पाहिजे.”

हरियाणामध्ये आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वे ची पाहाणी केली. या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गडकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गुरुग्राममधील सोहना येथे जाऊन मुंबई दिल्ली एक्सप्रेस-वेच्या बांधकाम कुठपर्यंत पोहचलं आहे. कामात किती प्रगती झालीय याची पाहाणी केली.

Nitin Gadkari in Action Mode: जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वेची पाहणी करण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने पोहचले

या प्रवासासाठी सध्या १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वे मुळे १२ तासांवर येईल असं सांगितलं जातं आहे. गडकरींनीही या प्रकल्पाला उल्लेख करताना जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे असं म्हटलं आहे.