24 September 2020

News Flash

वजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवयच – नितीशकुमारांचा टोला

नितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवयच आहे.

| August 27, 2015 03:52 am

नितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवयच आहे. त्यांनी बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजऐवजी त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आधी द्यावीत, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी लगावला.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींची ‘ट्विटर’च्या माध्यमातून खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी दिलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक वाटा हा रस्ते निर्मितीसाठी आहे. एकूण पॅकेजमधील ५६ हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींवर टीका केली. बिहारमध्ये ४१ महामार्ग बांधण्यासाठी या पॅकेजमध्ये ५४,७१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४७,५५३ कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या सरकारच्या काळातच मंजूर करण्यात आले आहेत. केवळ ७,१६० कोटी रुपयांचे रस्ते बांधणी प्रकल्पच या पॅकेजमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहेत, याकडे नितीशकुमार यांनी लक्ष वेधले आणि गडकरीचा मुद्दा खोडून काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 3:52 am

Web Title: nitish asks gadkari to answers questions about his dept
Next Stories
1 पाकचे माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश
2 गुजरातमध्ये तणावपूर्ण शांतता, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर
3 रसगुल्ला मूळ बंगालचा की ओडिशाचा?
Just Now!
X