News Flash

बिहारमध्ये नितीश कुमारच ‘बिग बॉस’, नरेंद्र मोदींना JDS ने दिला सूचक इशारा

दहा राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होताच एनडीएतील घटक पक्ष जनता दल युनायटेडने भाजपाला सूचक इशारा दिला आहे

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेश बिहारसह दहा राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होताच एनडीएतील घटक पक्ष जनता दल युनायटेडने भाजपाला सूचक इशारा दिला आहे. आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर नितीश कुमारच बिहारमध्ये बॉस राहतील असे संकेत जेडीयूने दिले आहेत.

नितीश कुमार भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील चेहरा आहेत. नितीश बिहारमध्ये लोकप्रिय असल्यामुळेच ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत असे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस पवन वर्मा यांनी बैठकीनंतर सांगितले. २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू-आरजेडीच्या विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत किशोरही या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चारवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी भाजपा आणि अन्य घटक पक्षांची बैठक होणार आहे. त्याआधी बैठकीत काय भूमिका मांडायची यावर चर्चा करण्यासाठी जेडीयूची आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पोट निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएमधील घटकपक्षांनी भाजपा जास्त काळ मोठया भावाची भूमिका बजावू शकणार नाही असे स्पष्ट केले आहे.

सर्वच पक्षांनी पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजपा आणि जेडीयूमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच जेडीएसने दबावाचे राजकारण सुरु केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2018 6:51 pm

Web Title: nitish kuamar bihar bjp jdu
टॅग : Bihar,Bjp,Jdu
Next Stories
1 तीन दिवस जेवणच नाही, ५९ वर्षीय महिलेचा भूकेने तडफडून मृत्यू
2 लग्नाच्या १७ दिवस आधी सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद
3 FB Live बुलेटीन: प्रकाश राज काँग्रेसवर संतापले… मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन आणि अन्य बातम्या
Just Now!
X