बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला आहे. काही खाती नव्या मंत्र्यांना देताना विभागणीही करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याकडे अर्थ खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, विधानसभेत भाजपचे आमदार प्रेमकुमार यांना कृषीमंत्रीपद देण्यात आलं आहे.

अनेक मंत्र्यांना त्यांचं आधीचंच खातं देण्यात आलं आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. शनिवारी संध्याकाळी पाटणा येथील राजभवनात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींनी २६ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंगल पांडेय यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
नितीशकुमार– मुख्यमंत्री, गृह खातं, सामान्य प्रशासन, कर्मचारी विभाग आणि इतर
सुशीलकुमार मोदी-उपमुख्यमंत्री, अर्थ खातं, वाणिज्य खातं, वन आणि पर्यावरण खातं, आयटी

विजेंद्र यादव- उर्जा, उत्पादन आणि मद्य निषेध
डॉ. प्रेम कुमार- कृषी मंत्री
नंदकिशोर यादव– रस्ते निर्मिती

मंगल पांडेय-आरोग्य खातं
ललन सिंह-जलसंधारण, योजना आणि विकास
श्रवण कुमार-ग्रामिण विकास, संसदीय कामकाज
राम नारायण मंडल-महसूल आणि भू विकास
जय कुमार सिंह-उद्योग आणि विज्ञान
प्रमोद कुमार- पर्यटन
कृष्ण नंदन वर्मा- शिक्षण खातं
महेश्वर हजारी- गृहनिर्माण खातं
शैलेश कुमार- ग्रामिण कामकाज
सुरेश शर्मा- नगर विकास आणि घरं बांधणी योजना
मंजू वर्मा- समाज कल्याण<br />विजय कुमार सिन्हा- कामगार
संतोष कुमार निराला- परिवहन
राणा रणधीर सिंह- सहकार खातं
खुर्शीद आलम- अल्पसंख्यक कल्याण आणि उस उद्योग
विनोद सिंह- खाण खातं
मदन सहनी- अन्न आणि प्रशासन
कपिल देव कामत- पंचायत राज
दिनेशचंद्र यादव- लघू सिंचन आणि आपत्ती व्यवस्थापन
रमेश ऋषिदेव- अनुसूचित जाती जमाती
पशुपति कुमार पारस- पशू आणि मत्स्य व्यवसाय
कृष्ण कुमार ऋषि- सांस्कृतिक खातं
बृज किशोर बिंद – मागास आणि अतिमागासवर्गीय विकास खातं

कॅबिनेटचा विस्तार शनिवारी संध्याकाळीच करण्यात आला आहे. या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नसल्यानं जीतनराम मांझी नितीशकुमारांवर आणि रामविलास पासवान यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत.

रामविलास पासवान यांची सत्तेची भूक संपलेली नाही, म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांच्या दारात गेले राजकारण आता कोणत्या थराला जातंय सांगताच येत नाहीये असंही ट्विट जीतनरामन मांझी यांनी केलं आहे.