जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार येत्या शुक्रवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर स्वपक्षीयांकडूनच टीका होत असल्याने आता मोदी शपथविधीला उपस्थित राहणार का, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

नितीश यांनी बुधवारी दूरध्वनी करून मोदी यांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मोदी यांना निमंत्रित करणे हा राजकीय शिष्टाचाराचा एक भाग होता, मात्र उपस्थित राहावयाचे की नाही याचा निर्णय मोदींनी घ्यायचा आहे, असे प्रदेशाध्यक्ष सिंह म्हणाले.